नवीन नाशिक मित्र परिवार या नावाने स्थापलेल्या संस्थेत जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर झोपेत असणारी पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहरात वेगवेगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असले तरी संयोजकांकडून पोलीस यंत्रणेला नेहमीच ठेंगा दाखविला जातो. या पाश्र्वभूमीवर शहरात मनोरंजनाचे कार्यक्रम करताना पोलीस यंत्रणेची परवानगी न घेतल्यास जागा मालकासह संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लेखानगरसमोरील इमारतीत नवीन नाशिक मित्र परिवार या नोंदणीकृत संस्थेच्या कार्यालयात जुगार खेळताना ४२ जणांना पकडण्यात आले. संस्थेचा प्रमुख पदाधिकारी राजेश अडांगळे याच्यामार्फत हा जुगाराचा अड्डा चालविला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. महत्त्वाची बाब म्हणजे, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या संस्थेत हा प्रकार सुरू होता. शहरात या पद्धतीने स्थापलेल्या अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांमार्फत विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये नाटय़प्रयोग, नृत्य, नाच-गाणे, आनंदमेळे, रासदांडिया, प्रदर्शन आदींचा समावेश असतो. बहुतांश ठिकाणी तर भर रस्त्यातच हे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे रस्ता बंद होऊन वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. शहरात दररोज असे कार्यक्रम उत्साहात पार पडत असले तरी संयोजकांकडून पोलीस आयुक्तालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही, असे खुद्द पोलीस यंत्रणेने म्हटले आहे.
वास्तविक, मनोरंजन व करमणूक परवाना पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त करणे कायदेशीरपणे अनिवार्य व बंधनकारक असताना त्याचे पालन होत नसल्याने गैरप्रकार घडत असल्याचे लेखानगर भागातील घटनेवरून उघड झाले. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी परवानगीशिवाय असे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केल्यास सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. विनापरवाना कोणताही कार्यक्रम आयोजित केला गेल्यास जागा मालकासह कार्यक्रम सादर करणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कार्यक्रमही बंद केले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2013 रोजी प्रकाशित
विनापरवाना मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांवर आता गुन्हा
वीन नाशिक मित्र परिवार या नावाने स्थापलेल्या संस्थेत जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर झोपेत असणारी पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहरात वेगवेगळ्या मनोरंजनात्मक
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-08-2013 at 09:06 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now offence on who will organise the programs without permission