एका वर्षांत ६० चित्रपट, म्हणजे महिन्याला पाच चित्रपट, ही आकडेवारी आहे यंदा प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची. पण यापैकी मोजक्या चित्रपटांचा अपवाद वगळता अनेक चित्रपटांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे..
मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही किंवा प्रेक्षागृह नाही, अशी हाकाटी प्रत्येक वर्षी होतच असते. मात्र दरवर्षी प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची संख्या एवढी वाढत आहे की, एवढे चित्रपट पाहायला प्रेक्षक कसे आणि कुठून येणार, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मग स्वाभाविकपणे चांगलं ते काही काळ टिकतं. पण सुक्याबरोबर ओलंही जळतं, या न्यायाने अशा प्रकारे ‘गंडविणाऱ्या’ चित्रपटांवर प्रेक्षकांच्या ओढविणाऱ्या रोषाचा फटका काही चांगल्या चित्रपटांना बसल्याशिवायही राहत नाही. यंदा प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची अवस्था नेमकी अशीच आहे.
या वर्षांची सुरुवात अत्यंत आशादायक आणि महत्त्वाकांक्षी अशा ‘शाळा’ या चित्रपटाने झाली. मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटावर उलटसुलट टीका झाली, तरीही या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला. मात्र पहिल्या तिमाहीत ‘शाळा’चा अपवाद वगळता इतर नऊ चित्रपटांनी प्रेक्षकांची आणि तिकीटबारीचीही निराशाच केली. विशेष म्हणजे एकटय़ा फेब्रुवारी महिन्यात चार चित्रपट प्रदर्शित झाले.
एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीची सुरुवातही ‘बाबू बँडबाजा’ या हटके चित्रपटाने झाली. विविध महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाने तिकीटबारीवर फारसा गल्ला जमवला नसला, तरी आशयाच्या बाबतीत हा चित्रपट वरचढ होता. हे तीन महिने मराठी चित्रपटसृष्टीसाठी स्वप्नवत गेले, असंच म्हणावं लागेल.
या तीन महिन्यांत तब्बल २० चित्रपट झळकले. यात ‘काकस्पर्श’, ‘तुकाराम’ या दोन सर्वोत्तम चित्रपटांचा समावेश होता. मात्र या तिमाहीचं दुर्दैव म्हणजे, मराठी निर्मात्यांनी कोणतंही नियोजन न करता एकेका दिवशी चार-पाच चित्रपट प्रदर्शित करून स्वत:चंच नुकसान करून घेतलं. ‘चिंटू’, ‘आरोही’, ‘आम्ही का तिसरे’ असे काही चांगले चित्रपटही या दरम्यान आले. मात्र इतर अनेक चित्रपटांच्या गर्दीत ते हरवले. या महिन्यांत आलेल्या अशा काही दर्जेदार चित्रपटांबरोबरच ‘बाबुरावला पकडा’, ‘लावू का लाथ’ वगैरे चित्रपटांनीही आपली हजेरी लावून घेतली.
जुलै ते सप्टेंबर अशा तीन महिन्यांत ‘भारतीय’, ‘सत्य, सावित्री आणि सत्यवान’, ‘चॅम्पियन्स’, ‘बदाम
शेवटच्या तीन महिन्यांमधील सर्वात आश्वासक चित्रपट म्हणजे ‘श्री पार्टनर’. अत्यंत उत्तम बांधणी असलेल्या या चित्रपटाला वपुंच्या पुण्याईचा आणि त्यांच्या चाहत्यांचा फायदा म्हणावा तसा फायदा उचलता आला नसला, तरी चित्रपटाने बऱ्यापैकी धंदा केला. त्याचप्रमाणे ‘नाइट स्कूल’, ‘आयना का बायना’, ‘श्यामचे वडील’, ‘पिपाणी’ या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीचं भविष्य आश्वासक असल्याची ग्वाही दिली.
या वर्षांत ग्रामीण पाश्र्वभूमीवर चित्रित झालेले किंवा ग्रामीण पाश्र्वभूमीवर आधारित चित्रपट चांगलेच गाजले. यात ‘काकस्पर्श’, ‘भारतीय’, ‘पिपाणी’ अशा काही मोजक्या चित्रपटांची उदाहरणं देता येतील. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ‘भारतीय’ चित्रपटाच्या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीची मक्तेदारी, मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना दिली जाणारी सापत्न वागणूक अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या.
या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीसाठी आश्वासक बातमी म्हणजे सांस्कृतिक संचालनालय, मराठी चित्रपट महामंडळ आणि राज्य सरकार यांनी एकत्र येत खास मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहे तयार करता येतील का, याबाबत विचार सुरू केला आहे. या प्रकरणी अनेक प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर आता पुढील वर्षी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सरत्या वर्षांत आता मराठी चित्रपट थेट तुमच्या मोबाइल फोनवर, तेसुद्धा कोणत्याही पायरसीशिवाय मिळण्यासाठीही काहींनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पुढल्या वर्षांत मराठी चित्रपट घराघरात पोहोचेल, असं चित्र निर्माण झालं आहे.
संख्या वाढली, दर्जाचं काय?
एका वर्षांत ६० चित्रपट, म्हणजे महिन्याला पाच चित्रपट, ही आकडेवारी आहे यंदा प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची. पण यापैकी मोजक्या चित्रपटांचा अपवाद वगळता अनेक चित्रपटांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-12-2012 at 01:21 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number increased what about quality