पालिकेच्या परिचर्य महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होणाऱ्या परिचारिकांना वाऱ्यावर सोडून मुंबईबाहेरील परिचारिकांना पालिका रुग्णालयांचे दरवाजे खुली करणारी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ प्रक्रिया रद्द न केल्यास ती अंमलात येऊ देणार नाही, अशा इशारा मनसेने दिला आहे. तर शिवसेनेच्या कामगार संघटनेनेही या मुद्दय़ाविरोधात थेट महापौर व आयुक्तांविरुद्ध दंड थोपटले आहेत. तसेच कराराचा भंग केल्याप्रकरणी अन्य कामगार संघटना विरोधात औद्योगिक न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.
१५ ते १७ एप्रिल या कालावधीत पालिका रुग्णालयांमध्ये ‘वॉक इन इंटरव्ह्यू’च्या माध्यमातून परिचारिकांची भरती करण्यात येणार आहे. यापूर्वी पालिकेच्या परिचर्य महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या परिचारिकांची पालिका रुग्णालयात भरती करण्यात येत होती. त्यामुळे या भरतीस कामगार संघटनांकडून विरोध होऊ लागला आहे. पालिकेचे तत्कालीन उपायुक्त सुब्बाराव पाटील यांच्याबरोबर १९९९ मध्ये कामगार संघटनांनी केलेल्या चर्चेनंतर पालिकेच्या परिचर्य महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या परिचारिकांची पालिका रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ‘वॉक इन इंटरव्ह्यू’च्या माध्यमातून प्रशासनाने या कराराचा भंग केला आहे, असा आरोप हिंद ही प्रक्रिया रद्द केली नाही, तर औद्यागिक न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या संघटनेचाही इशारा
दरम्यान, पालिकेच्या परिचर्य महाविद्यालयांतून उत्तीर्ण झालेल्या परिचारिकांना भरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी केली आहे. याबाबतचे एक पत्र महापौर सुनील प्रभू आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना देण्यात आले आहे. या दोघांनी नी या प्रकरणात लक्ष घातले नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही चिटणीस यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2013 रोजी प्रकाशित
‘वॉक इन इंटरवू’द्वारे पारिचारिकांची भरती
पालिकेच्या परिचर्य महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होणाऱ्या परिचारिकांना वाऱ्यावर सोडून मुंबईबाहेरील परिचारिकांना पालिका रुग्णालयांचे दरवाजे खुली करणारी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ प्रक्रिया रद्द न केल्यास ती अंमलात येऊ देणार नाही, अशा इशारा मनसेने दिला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-04-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurse recruitment thru walk in interview