आरोग्यसेवा आणि सुश्रुषेच्या प्रक्रियेत रुग्णालयातील परिचारिकांनी विचारपूर्वक निर्णय घेताना चिकित्सक, परिवर्तनीय, रचनात्मक आणि निश्चयी असले पाहिजे, असे प्रतिपादन स्वीडन येथील कार्लस्टड विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. एल्सी अॅथलीन यांनी केले.
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालयाद्वारे सावंगी येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. सावंगीच्या दत्ता मेघे सभागृहात रुग्णालयीन सुश्रुतेतील कृतीबाबत पुराव्यांचा शोध (सर्च ऑफ एव्हिडन्स फ ॉर अॅक्शन इन क्लिनिकल नर्सिंग) या विषयावर आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते झाले. समारोहाला डॉ. अॅथलीन, स्वीडनच्या डॉ.केरस्टी थिएंडर, नॉर्वेच्या डॉ. रेईडन होव, पुण्याच्या डॉ. श्रीप्रिया गोपालकृष्णन, विद्यापीठाचे मुख्य समन्वयक डॉ. एस.एस.पटेल यांच्यासह संशोधन विभाग संचालक डॉ. तनखीवाले, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, दंत शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ.श्याम भुतडा, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.सी.गोयल, परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्य बी.आर.गोयल, प्राचार्य टेस्सी सॅबॅस्टियन, नर्सिंग शाखेच्या समन्वयक मनीषा मेघे, अधिपरिचारक नीरज कलहरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुग्णालयीन सुश्रुतेत दर्जात्मक व प्रभावी सुधारणा घडविण्यासोबतच ती सेवा सर्वांना सहजपणे उपलब्ध होणेही महत्वाचे ठरते. त्या दिशेने वाटचाल करतानाच उत्कृष्ट कार्याला सवरेकृष्ट कार्यात परिवर्तित करण्याची प्रेरणा देण्यासाठी ही कार्यशाळा आहे. राष्ट्रीय कार्यशाळेची आंतरराष्ट्रीय व्याप्ती होणे हे आयोजनाचे यश असते. ही कार्यशाळा संस्थेच्या दृष्टीने एक लहान पाऊल असले तरी भविष्यकालीन मानवसेवेची व्यापक नांदी असेल, असे उद्गार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले. प्रास्ताविक सिस्टर सॅबॅस्टियन यांनी केले. संचालन प्रा.जया गवई व प्रा.रंजना शर्मा यांनी, तर आभार आयोजन सचिव प्रा.सीमा सिंग यांनी मानले.
या दोन दिवसीय कार्यशाळेत सर्च ऑफ एव्हिडन्स, ट्रान्झक्शन ऑफ एव्हिडन्स इनटू अॅक्शन फ ॉर व्हॅलिडेशन अॅण्ड स्टॅण्डर्डायझेशन व रिझल्टन्ट इनटू हेल्थ नर्सिग प्रक्टिसेस् या विषयावर विज्ञानसत्रे झाली. या सत्रांमध्ये डॉ. थिएंडर, डॉ.अॅथलीन, डॉ.होव, ऑस्ट्रेलियातील डॉ.कोसा, डॉ.श्रीप्रिया गोपालकृष्णन, प्रा.खुर्शीद जामदार, डॉ. सरोज उपासनी, मंगलोरच्या डॉ.श्रीवणी, केरळच्या डॉ.सिस्टर लुकिता आदींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत परिचर्याविज्ञान शाखेचे सुमारे २५० अध्यापक व अभ्यासक सहभागी झाले होते.
‘परिचारिकांनी चिकित्सक, रचनात्मक व निश्चयी असणे गरजेचे’
आरोग्यसेवा आणि सुश्रुषेच्या प्रक्रियेत रुग्णालयातील परिचारिकांनी विचारपूर्वक निर्णय घेताना चिकित्सक, परिवर्तनीय, रचनात्मक आणि निश्चयी असले पाहिजे, असे प्रतिपादन स्वीडन येथील कार्लस्टड विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. एल्सी अॅथलीन यांनी केले.
First published on: 06-02-2013 at 02:26 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurses should be critical constructive and firm is necessary