सहकार क्षेत्रातील ओबीसी भटके विमुक्तांचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत बांधकाममंत्री छगन भुजबळ व खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत येथे ३ फेब्रुवारीला राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार डॉ. जे. एम. वाघमारे, माजी मंत्री आनंदराव देवकते, आमदार गणपत देशमुख, प्रकाश शेंडगे व विजयराजे शिंदे यांनाही निमंत्रित केले आहे. सहकार क्षेत्रातील आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना निवेदने देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णयही परिषदेत घेतला जाणार आहे.सर्व जाती-जमातीच्या पदाधिकाऱ्यांनाही परिषदेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

Story img Loader