राज्य सरकारच्या सहकारातील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ बुधवारी ओबीसी व भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
अ‍ॅड. अण्णाराव पाटील, मकरंद सावे, श्रीरंग शेवाळे, राजेंद्र वनारसे, भारत चामे, बसवंत उबाळे, मोहन माने, धनराज माने, असिफ बागवान, विजयकुमार साबदे, चंद्रकांत चिकटे, रंगनाथ घोडके आदी मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्याचे सहकार क्षेत्रातील आरक्षण कायम ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे सहकार क्षेत्रात पूर्णत: मंडल आयोग लागू करावा. देशात व महाराष्ट्रात ओबीसी आणि भटक्या विमुक्त एकूण लोकसंख्येच्या ७४.५ टक्के प्रमाणात असताना ६५ वर्षांत प्रस्थापित राज्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवले आहे. सहकाराला स्वायत्त करण्याच्या नादात दिले जाणारे तुटपुंजे आरक्षणही रद्द केले आहे. ओबीसी व भटक्या विमुक्तांना देशोधडीला लावायचा हा निर्णय असून, तो पूर्णपणे या समाजाच्या हक्काची गळचेपी करणारा आहे, असे निवेदनात म्हटले आहे. गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ओबीसी व भटक्या विमुक्तांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा