केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताला लोकसंस्कृती आणि लोककलांची परंपरा असून मनोरंजनातून लोकशिक्षण करण्याचे मोठे सामथ्र्य लोककलांमध्ये आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नुकतेच मुंबईत ऑक्टेव्ह फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी केले.
मुंबई विद्यापीठाची शाहीर अमर शेख अध्यासन लोककला अकादमी, संगीत विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानगरी संकुल, कालिना येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांचे सहकार्य या महोत्सवास मिळाले आहे.
महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया आदी उपस्थित होते. लोककला अकादमीचे प्रकाश खांडगे यांनी प्रास्ताविक तर मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader