कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दीपक चाटे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या चौकशीचा अहवाल पाठविण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. जि. प. प्रशासनाकडून चौकशी अधिकाऱ्याची नियुक्तीही झाली. दि. ११ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश असला, तरी प्रत्यक्ष चौकशी मात्र अजूनही सुरू झालेली नाही! कळमनुरी पंचायत समितीने सर्वसाधारण सभेत गटविकास अधिकारी दीपक चाटे यांच्या असमाधानकारक कामाबाबत नाराजी व्यक्त करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव मंजूर केला. या बाबतचा अहवाल जि. प. प्रशासन व विभागीय आयुक्तांना पुढील कारवाईसाठी पाठविला. आयुक्तांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ‘सीईओ’ श्वेता सिंघल यांनी कल्पना क्षीरसागर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल ११ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशात नमूद असताना अजून चौकशीला सुरुवात झाली नसल्याचे माहीतगार सूत्रांकडून समजते.

Story img Loader