शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार शिर्डीचे प्रांताधिकारी अजय मोरे व उपकार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार राहात्याचे तहसीलदार आप्पासाहेब िशदे यांनी शुक्रवारी सांयकाळी उशिरा स्वीकारला.
या दोघांकडेही संस्थानची प्रभारी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. संस्थानचे व्यवस्थापनही प्रभारीच आहे. संस्थानचे पूर्ण नियंत्रक मंडळच यामुळे प्रभारी झाले आहे. संस्थानवर सध्या जिल्हा प्रधान न्यायधीश जयंत कुलकर्णी हे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार सदस्य आहेत. संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी किशोर मोरे यांची दि. १ फेब्रुवारी २००८ ला नियुक्ती झाली होती, वेळोवेळी मुदतवाढीनंतर त्यांचा कार्यकाल गेल्या दि. ३१ जुलैला संपला. उपकार्यकारी अधिकारी म्हणून राहात्याचे तत्कालीन तहसीलदार डॉ. यशवंत माने यांचाही कार्यकाळ गेल्या दि. १७ ला संपला. त्यांची नियुक्ती िपपरी चिंचवड महापालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडेच संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार होता. त्यांच्या बदली नंतर संस्थानचे कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त होती.
या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारकडून कोणताही आदेश मिळत नसल्याने संस्थाने अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश जयंत कुलकर्णी यांनी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब साबळे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. मात्र शुक्रवारी विधी व न्याय विभागाने मोरे व िशदे यांच्याकडे प्रभारी स्वरूपात नियुक्ती केली.

Story img Loader