सरासरीपेक्षा निम्माही पाऊस झाला नसल्याने जिल्हय़ात तीव्र दुष्काळाची छाया आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र अनेक सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवत असल्याचे चित्र आहे.
चालू महिन्याचा तिसरा आठवडा संपताना घनसावंगी पंचायत समिती कार्यालयात तहसीलच्या पथकाने तपासणी केली असता तेथे ४८ पैकी ४२ कर्मचारी अनुपस्थित आढळले. गेल्या आठवडय़ात बदनापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा तहसील कार्यालयाने पंचनामा केला असता कृषी अधिकाऱ्यासह ६ कर्मचारी गैरहजर आढळून आले. चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या अखेरीस भोकरदन सिंचन विभागाच्या विविध तीन कार्यालयांचा पंचनामा केला असता, अभियंत्यांसह ३३ कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आढळून आली. काही दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील शिवाची वाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांना शाळाच बंद आढळली. दोनच दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आशाताई भुतेकर यांनी बदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेस भेट दिली असता एकाच वेळी ७ शिक्षक रजेवर असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे २३पैकी ७ शिक्षकच उपस्थित असल्याचेही आढळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offices empty in drought shadow