* आरोप-प्रत्यारोपांची मालिका
*  मुंबईत आंदोलनाचा इशाराू
मूकबधीर औद्योगिक संस्थेतील वादाने पुन्हा उचल खाल्ली असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अन्याय निवारणार्थ कृती समिती येत्या १८ व १९ जुलैला मुंबईच्या आझाद हिंद मैदानावर दोन दिवसांचे आंदोलनाची हाळी दिली आहे. शंकरनगर चौकातील या संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून संस्थेतील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधील वाद वारंवार चव्हाटय़ावर येत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.
संस्थेचे दिलीप गोडे व्यक्तिगत स्वार्थासाठी कर्मचाऱ्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप समितीच्या अध्यक्ष डॉ. मीनल सांगोळे, उपाध्यक्ष हेमंत कऱ्हाडभाजणे, सचिव मकरंद गोरे, कोषाध्यक्ष चारुदत्त राजदेरकर, सहसचिव कमल वाघमारे, वर्षां दप्तरी, मीनाक्षी गुंडेवार, अर्चना राठोड, सरला वाघमारे, साधना पाथड्रकर आणि अनिल लुटे यांनी पत्रकार परिषदेत केला.  
गेल्या पाच वर्षांत संबंधित व्यवस्थापनाचे प्रकरण फारच चिघळले असून व्यवस्थापनाविरोधात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अंतर्गत धुसफूस अनेकदा चव्हाटय़ावर आली आहे. समितीने संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्याची विनंती केली. जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीनेही संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर पुण्याचे अपंग कल्याण आयुक्त यांनी सुनावणी केली. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांतील वादामुळे संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली असून ८० कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील, असे सदर कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संस्थेवर प्रशासक नियुक्त करावा, शिक्षक, कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता शासनाच्या नियमानुसार करावी, शाळेची वेळ जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी ठरवल्याप्रमाणे सकाळी ८ ते ११ असावी, वसतिगृहातील कर्णबधिर विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा व आरोग्यदायी जेवण द्यावे, विद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सचिव स्वत:च्या वैयक्तिक व घरगुती कामासाठी वापरतात हा प्रकार त्वरित थांबवावा, शिक्षक कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी, वेतनवाढ, पदोन्नती दिली जावी. मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी सहल, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धासारखे उपक्रम राबवण्यास परवानगी नाकारू नये. विद्यार्थ्यांना देणगीच्या माध्यमातून आलेले धान्य व जेवण संस्थेचे दाखवून त्यावर शासनाचे अनुदान लाटणे थांबवावे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सतत काही ना काही कारणे दाखवून पैशाची मागणी करणे थांबवावे, इत्यादी १३ मागण्यांसह मुंबईत आंदोलन छेडण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोडे यांनी आरोप फेटाळले
संस्थेचे सचिव दिलीप गोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला. ते म्हणाले, आयुक्तांनी निर्णय देऊनही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेजबाबदार वागतात. दोन पाळ्यांमध्ये शाळा असतानाही उपस्थित राहत नाहीत. पगार मात्र वेळच्या वेळी उचलतात. शिकविण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांना शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना भडकविण्यात जास्त स्वारस्य आहे. आज शाळेत ४२५ विद्यार्थी आहेत. मात्र त्यांच्याकडे पाहिजे तसे लक्ष ही मंडळी देत नाहीत आणि नियमावर बोट ठेवले की अन्याय झाला म्हणून सांगतात. पत्रकार परिषदेला जे लोक उपस्थित होते. ते मूठभर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नातेवाईक होते. स्वत: अपंग आयुक्तांनी ही यांच्या विरोधातच निकाल दिल्याने सर्व प्रकरण निकाली निघाले आहे.