विधिमंडळाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा समारोप नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान होणार असल्यामुळे विधिमंडळ परिसर आणि सभागृहांची रंरंगोटी, सजावट व दुरुस्ती सुरू असून सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आता वेगाने कामाला भिडले आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना राज्य शासन कोटय़वधी रुपये रंगरंगोटी व सजावटीवर उधळत असल्याने जनमंचसह काही सामाजिक संघटनांनी त्याला विरोध केला आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला १० डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून सर्व रामगिरी, देवगिरी, रविभवन, आमदार निवास, नागभवनसह सचिवालय आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची रंगरंगोटी आणि स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचे वैशिष्टय़ म्हणजे विधानभवनात कॅबिनेट सभागृह तयार करण्यात येणार आहे. या सभागृहात ५० मंत्र्याची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी कॅबिनटच्या बैठकीसाठी हैद्राबाद हाऊस शिवाय पर्याय नव्हता. एखादी कॅबिनेटची तातडीची बैठक असल्यास सुरक्षेपासून तर वाहनांची सोय करण्यात पोलीस आणि प्रशासनाची तारांबळ उडत होती मात्र आता विधानभवन परिसरात कॅबिनेट सभागृह तयार करण्यात आल्यामुळे पोलिसांचे आणि प्रशासनाचे काम हलके झाले आहे. शिवाय मंत्रिमंडळाचे निर्णयही झटपट घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या तुलनेत नागपूरचे हिवाळी अधिवेशन सत्तापक्षाबरोबरच विरोधकांसाठी प्रतिष्ठेचे असते. अधिवेशनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वाजानिक बांधकाम विभाग सज्ज झाला असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहे. यावर्षी विधिमंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षांचा समारोप असल्यामुळे मंत्री आणि सचिवांच्या दालनाचे नुतनीकरण करण्यात येत आहेत तर अधिवेशन दरम्यान परिसारत स्थापन करण्यात येणाऱ्या पक्ष कार्यालयाचे नवीनीकरण करण्यात आले आहे. कार्यालयाला स्पार्टेक्स टाईल्स व प्लास्टर ऑफ पॅरिसने सुशोक्षित केले आहे. मोठय़ा प्रमाणात राजस्थानमधून संगमरवरी फरशा मागविण्यात आल्या आहेत. बिहारमधून आणलेले मार्बलचे काम करणारे १५ कारागिर दिवस-रात्र काम करीत आहेत. मोकळ्या परिसरात अॅट्राटाईल्स लावण्यात येत आहे असून रामगिरी, देवगिरी आणि नागभवन परिसरातील हिरवळीवर आकर्षक सजावट करण्यात येत आहेत. अधिवेशनाच्या निमित्त शेकडो हात सध्या कार्यरत असून अनेक कंत्राटदारांनी बाहेरील राज्यातील कारागिरांना बोलविले आहे त्यामुळे स्थानिक कारागिरांनी त्याला विरोध केला जात असल्याचे बोलले जात आहे. अधिवेशना दरम्यान खर्च कमी करा असे सरकारी आदेश आल्याचे सार्वजानिक बांधकाम विभागातील अधिकारी सांगत असले तरी केवळ सजावटीवर आणि रंगरंगोटीवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात असल्याचे बोलले जात आहे.
विधिमंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या समारोप तयारीवर कोटय़वधींची उधळण
विधिमंडळाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा समारोप नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान होणार असल्यामुळे विधिमंडळ परिसर आणि सभागृहांची रंरंगोटी, सजावट व दुरुस्ती सुरू असून सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आता वेगाने कामाला भिडले आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना राज्य शासन कोटय़वधी रुपये रंगरंगोटी व सजावटीवर उधळत असल्याने जनमंचसह काही सामाजिक संघटनांनी त्याला विरोध केला आहे.
First published on: 17-11-2012 at 12:47 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On occasion of assembly completing hundred years lots of money expense in programme