ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी, यादृष्टीने गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या जवळपास चार हजार जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव जिल्हय़ाच्या विविध पोलीस ठाण्यांकडून आले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ते पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हय़ात ७०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २६ नोव्हेंबरला होत आहेत. राजकीयदृष्टय़ा संवेदनशील जिल्हय़ातील गावपातळीवरील निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हय़ातील सर्व पोलीस ठाण्यांकडून गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या आणि ज्यांच्यामुळे निवडणूक प्रक्रियेला बाधा निर्माण होऊ शकते, अशा लोकांना तडीपार करण्याचे प्रस्ताव मागविले आहेत. एकटय़ा बीड उपविभागातून दोन हजार प्रस्ताव आहेत. यात प्रामुख्याने विविध गुन्हे दाखल झालेले व शांतता भंग होईल, अशा व्यक्तींचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत काही दिवसांसाठी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले.     

Story img Loader