मराठी चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीचे दोन दिग्गज एका चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकमेकांसह काम करत आहेत. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’च्या यशानंतर सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर मोठय़ा पडद्यावर ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे ‘काकस्पर्श’मध्ये या दोघांची जुगलबंदी असली, तरी त्यावेळी महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेत होते. मात्र आता या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची संधी मिळणआर आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. ‘आजचा दिवस माझा’ हा चित्रपट राजकारणातील भाबडय़ा आशेवर, तेथे सत्तेसाठी चाललेल्या नागडय़ा स्वार्थावर आणि तरीही त्या राजकारणात दडलेल्या मानवी चेहऱ्यावर आधारीत आहे. या पाश्र्वभूमीवर सामान्य माणसाचे काय स्थान असते, याबाबतही हा चित्रपट भाष्य करणार आहे. ‘बिनधास्त’, ‘भेट’, ‘कायद्याचे बोला’ आणि नुकत्याच गाजलेल्या ‘तुकाराम’ या चित्रपटांत लेखन, दिग्दर्शन आदी बाबींवर काम करणारी टीमच या चित्रपटासाठीही काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचे असून लेखन अजित व प्रशांत दळवी यांचे आहे. ‘तुकाराम’ चित्रपटातील गाण्यांना अत्यंत मधूर स्वरसाज चढवणाऱ्या अशोक पत्की हेच या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहेत. त्याशिवाय अश्विनी भावे व सचिन खेडेकर या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. तसेच पुष्कर श्रोत्री, हृषिकेश जोशी आणि आनंद इंगळे अशा तगडय़ा कलाकारांनीही यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
पुन्हा एकदा ‘सचिन-महेश’ची पार्टनरशीप
मराठी चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीचे दोन दिग्गज एका चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकमेकांसह काम करत आहेत. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’च्या यशानंतर सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर मोठय़ा पडद्यावर ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.
First published on: 23-12-2012 at 12:56 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again partnership of sachin mahesh