जिल्हा प्रशासन व नगर पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात भीषण पाणीटंचाईने कहर केला आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या शहराला पंचवीस दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. महिन्यातून केवळ एकदा सार्वजनिक पाणीपुरवठा होणारे बुलढाणा हे राज्यातील एकमेव जिल्हा मुख्यालय आहे. भीषण पाणीटंचाईची हीच संधी साधून खासगी टँकर्सवाल्यांनी पाण्याचे भाव दुप्पट तिप्पट करीत नागरिकांची वारेमाप लूट चालविली आहे, असा आरोप करून लुटीला प्रतिबंध करावा व शहराला मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी युवा ग्रुपने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in