सोयाबीन उत्पादकांसाठी लातूरस्थित किसानमित्र वेअर हाऊसिंग प्रा.लि.ने राज्यात प्रथमच अनामत शेतीमाल ठेव योजना सुरू केली. त्यातून सुमारे ३५५ शेतकऱ्यांना भाववाढीचा दीड कोटीचा लाभ झाला. भावातील चढउतारामुळे हतबल होणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरली आहे.
सोयाबीनचे उत्पादन जगभरात घेतले जाते. सोन्याप्रमाणे दररोज त्याचे भाव निघतात. भावातील चढउतार मोठा असतो. किमान १५० रुपये भावातील चढउतार ठरलेला असतो. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत गेला की भाव पडतात व हंगाम संपल्यावर दोन-चार महिन्यांनी भावपातळी तेजीवर स्वार झालेली असते. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्याने माल विकलेला असल्यामुळे त्याचा लाभ व्यापाऱ्यांनाच मोठय़ा प्रमाणात होतो.
किसानमित्र वेअर हाऊसिंगने या वर्षी लातूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी अनामत शेतमाल ठेव योजना सुरू केली. यात शेतकऱ्याने आपला माल हंगामात अनामत ठेवायचा. ज्या दिवशी भाववाढ झाली असे त्याला वाटेल व पैशाची गरज भासल्यास त्याच्या मर्जीनुसार त्याचा माल विकता येतो. त्या दिवशी जे भाव असतील त्या भावाने त्याला पैसे दिले जातात. माल अनामत ठेवण्यापोटी किरकोळ स्वरूपाचे सेवाशुल्क घेतले जाते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी ना घरात जागा असते ना वेअर हाऊसमध्ये. अशा शेतकऱ्यांना वेअर हाऊसमध्ये माल ठेवण्याची सोय किसान वेअर हाऊसने प्रथमच केली. त्यातून या वर्षी एकूण ३५५ शेतकऱ्यांनी १३ हजार १०० क्विंटल माल अनामत म्हणून ठेवला. गेल्या ३ ऑक्टोबरला सोयाबीनचे बाजारपेठेतील भाव २ हजार ८१० रुपये प्रतिक्विंटल होते. दि. ८ एप्रिलला हा भाव ४ हजार ५५ रुपये होता. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी क्विंटलमागे १ हजार रुपये अधिक भाव या योजनेतून मिळतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा