पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील पारधी समाजाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पारनेरच्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एका युवकाला पारनेर पोलिसांनी आज मंगळवारी अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की रांजणगाव मशीद येथील पारधी समाजाची अल्पवयीन मुलगी कामानिमित्ताने पारनेर येथे आली असता दुपारी ४ च्या सुमारास येथील बसस्थानकासमोरील स्वच्छतागृहाजवळ बबल्या ऊर्फ सचिन रामभाऊ  औटी (वय २१) व अविनाश चौरे (वय २१, दोघेही रा.पारनेर) यांनी संबंधित अल्पवयीन मुलीला अश्लील शब्द वापरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच अॅसिड अंगावर ओतण्याची धमकी दिली. या मुलीने या संदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनुसूचित जाती-जमाती कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, बबल्या ऊर्फ सचिन रामभाऊ  औटी याला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. तर अविनाश चौरे हा आरोपी फरार आहे. पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader