पती-पत्नी व त्यांची तीन महिन्यांची मुलगी असे तिघे दिवाळी पाडव्याच्या दिवशी राहत्या घरातून बाहेर निघून गेले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे तिघे बेपत्ता असल्याबाबत नोंद करण्यात आली. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर झाल्यानंतर आधी पत्नी व नंतर अध्र्या तासाने पती घरातून निघून गेले. या विवाहितेसोबत तिची तीन महिन्यांची मुलगी होती.
दिलीप फुलचंद बर्डे (वय २५, वडगाव कोलाटी, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद), त्याची पत्नी दुर्गाबाई (वय २२) व त्यांची तीन महिन्यांची मुलगी अर्चना अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. दिलीपची आई चंद्रकलाबाई फुलचंद बर्डे (वय ५०, बाळापूर, तालुका व जिल्हा औरंगाबाद) यांनी याबाबत पोलिसात माहिती दिली. दिलीप हा पत्नी दुर्गाबाईसह आपल्या सासुरवाडीला, वडगाव कोलाटी येथे राहात होता. दिवाळी पाडव्याच्या दिवशी दोघा पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून कुरबुर झाली.
दोघांची एकास मारहाण
जुन्या भांडणातून जोगेश्वरी (तालुका गंगापूर) येथे दिनेश पिंपळे व दत्तू पिंपळे या दोघांनी गौतम पुंजाराम म्हात्रे यास मारहाण केली. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. गौतमने या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसात फिर्याद दिली.
तीन महिन्यांच्या मुलीसह विवाहिता, पतीही बेपत्ता
पती-पत्नी व त्यांची तीन महिन्यांची मुलगी असे तिघे दिवाळी पाडव्याच्या दिवशी राहत्या घरातून बाहेर निघून गेले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे तिघे बेपत्ता असल्याबाबत नोंद करण्यात आली. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर झाल्यानंतर आधी पत्नी व नंतर अध्र्या तासाने पती घरातून निघून गेले. या विवाहितेसोबत तिची तीन महिन्यांची मुलगी होती.
First published on: 16-11-2012 at 04:48 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One couple and there three month old daughter missing