सिडको वसाहतींमध्ये रस्त्यांवरील पथदिवे नसल्याने रहिवाशांच्या जिवावर बेतल्याची घटना कामोठे येथे घडली आहे. कामोठे येथील सेक्टर १९ ते २४ या परिसरातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. सिडकोच्या या अनास्थेच्या कारभारामुळे मंगळवारी रात्री एकाला आपला जीव गमवावा लागला. खांदेश्वर स्टेशनातून सेक्टर २४ येथील आपल्या घरी परतणाऱ्या आप्पा कदम यांना या अंधरात सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
खांदेश्वर स्टेशनातून सेक्टर २४ कडे जाण्यासाठी मार्ग आहे. मात्र येथे रात्रीचे पेटणारे पथदिवे बंद असल्याने पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना अंदाजावर आपले पुढचे पाऊल ठेवून घरापर्यंत यावे लागते. अंधाराचा फायदा घेऊन येथे महिलांची सोनसाखळी चोरण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत नागरिकांनी सिडकोला पथदिवे सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र कर्तव्याचे भान नसलेल्या सिडको अधिकाऱ्यांना कामोठेवासीयांचे काहीही सोरसुतक उरलेले नसल्याची खंत कामोठे येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत.
कामोठेत सर्पदंशाने एकाचा मृत्यू
सिडको वसाहतींमध्ये रस्त्यांवरील पथदिवे नसल्याने रहिवाशांच्या जिवावर बेतल्याची घटना कामोठे येथे घडली आहे.
First published on: 27-06-2014 at 07:01 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One dead by snakebite