भविष्य निर्वाह निधीचे कर्ज देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पालिका शिक्षण मंडळ अधिकाऱ्यास शहादा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. शहादा नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रवींद्र जयराम पानपाटील यांनी तक्रारदारास दूरध्वनी करून कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती देत दोन हजार रुपयांची मागणी केली. शनिवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पानपाटील हा अडकला. लाच घेताना त्यास अटक करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-12-2012 at 02:54 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One education officer got arrested for taking bribe