कृत्रिम पाणीटंचाई, वाढती महागाई, सावकाराचे कर्ज आदी समस्यांनी शेतकरी ग्रासले आहेत. आमगाव तालुक्यातील शिवणी येथे येथील शेतकऱ्यांनाही कमीअधिक प्रमाणात याची झळ पोहोचली आहे. मात्र, गावातील प्रगतीशील शेतकरी अशोक गायधने यांनी या समस्येवर मार्ग शोधून बागायती शेतीतून प्रगती साधताना परिसरातील शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित करून आíथक उन्नतीचा मार्ग दाखविला.
अशोक गायधने गेल्या पाच-सहा वर्षांपासून पारंपरिक शेती सोडून बागायतीकडे वळले. यातून त्यांनी आíथक प्रगती साधली आहे. त्यांनी आपल्या शेतातील १० आर जागेत दुधीभोपळाचे उत्पादन घेतले. त्यातून अवघ्या दोन महिन्यात २४ हजार रुपयांचा नफा मिळविला. या १० आर जमिनीवर लावलेल्या दुधीभोपळातून त्यांनी आतापर्यंत ३० िक्वटलपेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे. एक दुधीभोपळा ५ किलो ४०० ग्रॅम वजनाचा आहे. पाच ते आठ रुपये किलो दराने त्यांनी खुल्या बाजारात या दुधीभोपळ्याची विक्री केली. उत्तम शेतीतून आपली प्रगती कशी साधता येईल, याचे उदाहरण म्हणून त्यांनी आपल्या शेतात विविध पद्धतीची बागायती शेती केली. त्यांनी यापूर्वी १० आर जागेत कारली लावली होती. यातून त्यांनी ३० हजार रुपयांचा नफा मिळविला होता.
२० आरमध्ये वांगी लावून यातून त्यांनी १ लाख १७ हजारांचे उत्पादन घेतले होते. ३० आरमध्ये उसाचे उत्पादन घेऊन १४ टन उत्पन्न घेतले. यातून ५६ हजारांचा नफा मिळाला. दहा आरमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले होते. त्यातून त्यांनी ६५ हजाराचे उत्पादन घेतले होते. गायधने यांना मिरची लागवड व देखरेखीवर २५ हजार रुपये खर्च आला, तर ४० हजार रुपये नफा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. १२ आरमध्ये भेंडीचे उत्पादन घेतले. ३८ िक्वटल झालेल्या भेंडीतून ४७ हजार रुपये मिळविले. भेंडी लागवडीवर १५ हजार रुपये खर्च झाले, तर ३२ हजार रुपये नफा मिळाला.
तसेच १० आरमध्ये कोहळ्याचे उत्पादन घेतले. यातून २५ हजार नफा मिळाला. कोहळ्याला बाजारात १७ रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. फुलशेती २० आरमध्ये करून ३० हजाराचा नफा मिळविला.आपल्या शेतात एका भागात कारले, तर दुसऱ्या भागात दुधीभोपळा, असे उत्पादन ते घेत आहेत. गायधने यांच्या आधुनिक शेतीपद्धतीमुळे कमी मेहनतीत चांगले उत्पादन घेतले जात असल्याने परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतीची पाहणी करीत आहेत. त्यांच्या शेतीला आजपर्यंत अनेक अधिकारी व शेकडो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. या शेतकऱ्यांनीही आपल्या शेतातही बागायती शेती फुलवून आíथक प्रगती करण्याचा चंग बांधला.  

Story img Loader