कर्जापायी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खामगांव येथील हिंदुस्थान लिव्हरच्या पाठीमागे आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
श्रीधर नगर घाटपुरी येथील रहिवाशी हरीभाऊ लक्ष्मण सरडे (५३) यांनी कर्जाला कंटाळून स्वत:च्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी मृताचा मुलगा संतोष सरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरडे यांच्याकडे कर्ज थकल्याने ते गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त दिसत होते. त्यातच त्यांनी आज दुपारी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे सरडे कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.
खामगावात कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जापायी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खामगांव येथील हिंदुस्थान लिव्हरच्या पाठीमागे आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. श्रीधर नगर घाटपुरी येथील रहिवाशी हरीभाऊ लक्ष्मण सरडे (५३) यांनी कर्जाला कंटाळून स्वत:च्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
First published on: 21-03-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One farmer suside because of loan