आजारी वडिलांची सेवा करण्यासाठी नेमलेल्या व्यक्तींनेच घरातील धनादेश चोरून त्यावर खोटय़ा सह्य़ा करून एका लाख रुपये आपल्या खात्यावर जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरंजन वासुदेव तोरस्कर (वय ६१, रा. माणिक व्हिला, डेक्कन जिमखाना) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून गोविंद सकन्ना नामदार (रा. गहुंजे मैदानाजवळ, देहूरोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोरस्कर यांचे वडील औंध येथील संत अपार्टमेन्ट संघवीनगर येथील घरात पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या देखभालीसाठी दर महिना पंधरा हजार रुपये पगार देऊन नामदार याला कामावर ठेवले होते. तो वडिलांच्या बँकेचे पासबुक भरून आणण्याचे काम करीत होता. त्याने ३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान फिर्यादीच्या वडिलांच्या नावाने धनादेश चोरून त्यावर खोटय़ा सह्य़ा करून त्याद्वारे एक लाख चार हजार रुपये आपल्या खात्यावर जमा करून अपहार केला म्हणून तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भोईटे हे अधिक तपास करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा