इलेक्ट्रोकॅट्रीन मशीन खरेदी प्रकरणाची चौकशी होणार
रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रोकॅट्रीनमशीन खरेदी करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सोमवारी दिले. बाजारात हे मशीन एक लाख ९० हजार रुपयांना मिळत असताना पालिकेने हे मशीन तीन लाख रुपयांना खरेदी केले आहे.
सभागृह नेते शैलेश फणसे यांनी या खरेदीचा मुद्दा उपस्थित करून या यंत्राचे दरपत्रक बैठकीत सादर केले. या अगोदरही ‘एमआरआय’ मशिनची खरेदी अशाच चढय़ा दराने करण्यात आली होती. हायस्पीड ड्रिलिंग मशिनची खरेदी गेल्या वर्षभरापासून रखडली असल्याचे सांगून या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी केली. आरोग्य विभाग व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे प्रशासनाकडून या वेळी सांगण्यात आले.

टय़ुबलाइट खरेदीच्या प्रस्तावातही घोटाळा
टय़ुबलाइट खरेदीचा प्रस्तावही प्रशासनाकडून चढय़ा दराने स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. महापालिका २८ व्ॉटच्या फ्लोरोसेंट टय़ुबलाइट खरेदी करणार असून त्यासाठी प्रत्येकी १,१८८ रुपये मोजणार आहे. प्रत्यक्षात या क्षमतेची टय़ूब बाजारात ४२१ ते ४६० रुपयांना मिळत आहे. सभागृह नेते शैलेश फणसे आणि ‘मनसे’चे गटनेते दिलीप लांडे यांनी यांनी ही बाब बैठकीत उघड केली. याचीही चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष शेवाळे यांनी दिले.

Story img Loader