मुंबई सेंट्रल ते नवी दिल्लीदरम्यान १३ एप्रिल ते २९ जून या काळामध्ये आणखी एक वातानुकूलित सुपरफास्ट गाडी चालविण्यात येणार आहे. गाडी दर मंगळवारी आणि शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटेल. दरम्यान, वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान १२ एप्रिलपासून २ जुलैपर्यंत आठवडय़ातून दोन दिवस गाडी चालविण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल ते नवी दिल्लीदरम्यान पश्चिम रेल्वेने ३ एप्रिल ते २६ जून दरम्यान विशेष वातानुकूलित सुपरफास्ट गाडी सुरू केली होती.

Story img Loader