मिहानमध्ये बोईंग कंपनीच्या विमानांच्या देखभाल दुरुस्ती प्रकल्पाचे (एमआरओ) काम अंतिम टप्प्यात असतानाच आणखी एका कंपनीने ‘एमआरओ’ उभारण्यात रस दाखविला आहे. विमानाच्या देखभाल-दुरुस्ती क्षेत्रातील देशातील जुनी कंपनी इंदमारने मिहानमध्ये प्रकल्प सुरू करण्यासाठी साडे तीन एकर जमिनीची मागणी केली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने इंदमारच्या या प्रस्तावाला तत्त्वत मान्यता दिली आहे. या कंपनीला भविष्यात तीस एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. या कंपनीच्या एका चमूने मंगळवारी मिहानला भेट दिली आणि जागेची पाहणी केली, असे ‘एमएडीसी’चे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
या कंपनीने केवळ साडेतीन एकर जमिनीत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प बोईंगच्या तुलनेत फारच लहान असेल. ही कंपनी साधारणत: खासगी विमानांची देखभाल दुरुस्ती करते. बोईंगचा एमआरओ एअर इंडिया संचालित करणार आहे. एमएसडीसीने याआधी मॅक्स एअरोस्पेस आणि डय़ुक्स एव्हिएशन या एमआरओ कंपन्यांना जमीन दिली आहे. परंतु या कंपन्यांनी अद्याप प्रकल्प उभारलेला नाही. बोईंगचा एमआरओ जवळपास तयार असून, लवकरच एअर इंडियाला हस्तांतरित केला जाणार आहे.
मिहानमध्ये विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा आणखी एक प्रकल्प
मिहानमध्ये बोईंग कंपनीच्या विमानांच्या देखभाल दुरुस्ती प्रकल्पाचे (एमआरओ) काम अंतिम टप्प्यात असतानाच आणखी एका कंपनीने ‘एमआरओ’ उभारण्यात रस दाखविला आहे.
First published on: 06-02-2015 at 02:37 IST
TOPICSमिहान
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more repair and maintenance of aircraft project in mihan