समांतर जलवाहिनीचे ठेकेदार औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीला पाण्याचे देयक देण्यासाठी आरक्षित केलेल्या खात्यात ९४ कोटी ५० लाख रुपये महापालिकेकडून ठेवणे आवश्यक होते. एवढी मोठी रक्कम उभारण्यासाठी महापालिकेने आयडीबीआय बँकेकडे कर्ज मागितले होते. तो प्रस्ताव मान्य झाला. तथापि, ठेकेदाराला बँक गॅरंटीसाठी आवश्यक असणाऱ्या ७९ कोटींचे कर्जप्रकरण अजूनही लटकलेलेच आहे. कर्जाचा कागदोपत्री निपटारा करण्यासाठी अजून महिनाभराचा वेळ लागणार आहे. दरम्यान, ‘समांतर’च्या अडचणीतील एक समस्या सुटली, तर एक बाकी आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ७९२ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. पहिल्या वर्षी ठेकेदाराला प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी व पाण्याचे देयक देण्यासाठी ६३ कोटी रुपयांची रक्कम आवश्यक आहे. त्याच्या दीडपट रक्कम महापालिकेने स्वतंत्र खाते उघडून ठेवणे कराराचा भाग आहे. ९४ कोटी ५० लाख रुपयांची ही रक्कम मनपाकडे नव्हती. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या रकमेत दरवर्षी सहा टक्क्य़ांची वाढ महापालिकेला करावी लागणार आहे. नियुक्ती दिनांकापासून पुढील २० वर्षे ही रक्कम ठेकेदाराला देणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिकेने वॉटर पेमेंट रिझव्‍‌र्ह अकाऊंट काढावे, असे ठरविण्यात आले. त्या स्वतंत्र खात्यात त्या-त्या वर्षी किती रक्कम ठेवावी, याचा तपशीलही ठरविण्यात आला. ही रक्कम मिळाल्याने महापालिकेची एक समस्या सुटली. तथापि, ठेकेदाराकडून बँक गॅरंटी मिळाल्याशिवाय औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीला कार्यारंभ आदेश देणे महापालिका प्रशासनाला शक्य होणार नाही. एक समस्या सुटली असली तरी आणखी एक मोठा अडथळा कायम आहे. तो महिन्याभराने सुटेल, असे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा