वाहन परवाना मिळविण्यासाठी आता उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा पार करावी लागणार आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला शिकाऊ वाहन परवाना मिळवता येणार आहे. यामुळे वाहन परवान्याच्या कामात पारदर्शीपणा आणि गतिमानता येणार आहे. यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ११ संगणक बसविण्यात येणार आहे. यापैकी पाच संगणक सद्य:स्थितीत बसविण्यात आले असून आठवडय़ाभरात ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
यापूर्वी उमेदवारांची तोंडी परीक्षा घेण्यात येत असे. यामध्ये दलालामार्फत आलेला उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण होत असल्याचे चित्र होते. नियमानुसार किंवा दलालाशिवाय येणारा उमेदवार अनेकदा अनुत्तीर्ण होई. शिकाऊ उमेदवाराला या ऑनलाइन परीक्षेत १० प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यातील सहा प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा उमेदवार शिकाऊ वाहन परवान्यासाठी पात्र ठरणार आहे. परीक्षा घेण्यासाठी कार्यालयात एकूण ११ संगणक बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच संगणक आता बसविण्यात आले आहेत. १० संगणक हे उमेदवारांसाठी ठेवण्यात येणार असून एक संगणक अधिकाऱ्यासाठी असणार आहे.
येत्या आठ ते दहा दिवसांत नवी मुंबई स्क्रीन टेस्ट एन फॉर लर्नर लायसन्स हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात येणार असून त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली आहे. द नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने हे सॉफ्टवेअर विकसित केले असून त्यात वाहतूक नियमविषयक एकूण ४५० विविध प्रश्नांचा संच करण्यात आला आहे म् त्यापैकी प्रत्येक अर्जदाराला १० प्रष्टद्धr(२२४)्ना विचारण्यात येणार असून विशेष म्हणजे सर्व अर्जदारांना वेगवेगळे प्रष्टद्धr(२२४)्नाांचा संच देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला कॉपी करण्याचा प्रश्न उपस्थित राहणार नाही आणि त्याचा निकालही अचूक लागेल, असा विश्वास धायगुडे यांनी व्यक्त केला आहे. यात अनुत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला पुन्हा परीक्षेसाठी दुसऱ्या दिवशी यावे लागणार आहे. सध्या हे सॉफ्टवेअर पुणे, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी वापरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लगेचच लर्निग लायसन्स उपलब्ध करून देता येणे शक्य होणार असल्याचे धायगुडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा