कलात्मक आणि सृजनात्मक विचारशैलीतून छायाचित्रण करणाऱ्या नवख्या तसेच पारंगत छायाचित्रकारांसाठी ‘युनिव्हर्सल मराठी’ या संस्थेने ‘क्लिक’ ही ऑनलाइन फोटोग्राफी फेस्टिव्हल २०१३ आयोजन केले आहे.  स्पध्रेला फेसबुक युजर्सचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. छायाचित्रण कौशल्याला सोशल नेटवर्कच्या माध्यमातून उत्तेजन दिल्याने देशविदेशातूनही छायाचित्रे स्पध्रेसाठी येऊ लागली आहेत. स्पध्रेत भाग घेणाऱ्या सर्व इच्छुकांनी आपले कलात्मक छायाचित्र आणि आपली माहिती  click_universalmarathi@live.com या ई-मेल आयडीवर २७ मार्चपूर्वी पाठवावी, असे आवाहन  युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी के ले आहे. विस्टाजचे चेतन माथूर, एफएमजेसीचे प्रदीप गुप्ता, मंथनचे शशिकांत गवळी, स्वप्नसिद्धीमोवीजचे दत्ता जामखंडे आणि माइंडसेटचे प्रशांत कदम यांच्याकडून स्पध्रेचे परीक्षण केले जाणार आहे. छायाचित्रांचे खुले प्रदर्शन युनिव्हर्सल मराठीच्या माय मुंबई लघुपट महोत्सवात सादर केले जाईल. १  ते १५ एप्रिलपर्यंत फेसबुकवर पात्र स्पर्धकांची छायाचित्रे अपलोड करण्यात येतील. त्या माध्यमातून स्पर्धकांचे छायाचित्र अधिकाधिक फेसबुक युजर्सना पाहता येईल.  युजर्सच्या अधिकाधिक लाइक्स मिळवणाऱ्या तसेच परीक्षकांकडून निवडल्या जाणाऱ्या स्पर्धकाला विजेतेपद देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९८३३०७५७०६, ९७६८९३०८५३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Story img Loader