कार्तिकी यात्रेच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ‘विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन’ उपक्रमास आज प्रारंभ करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सांगितले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला होता.
ही ‘ऑनलाइन दर्शन सेवा’ १२ जिल्ह्य़ांतून १२२ तालुक्यांचे सेतू कार्यालय येथे पाच रुपये देऊन फॉर्म भरून दिली जाणार आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून कारभार हाती घेतल्यावर अण्णासाहेब डांगे यांनी दर्शनव्यवस्था सुलभ होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन दर्शनासाठी पाच रुपये देऊन सेतू कार्यालयात फॉर्म भरून दिल्यावर त्यावर फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचा फोटो येणार. त्यास दर्शन केव्हा मिळणार हे दुसरे दिवशी सांगण्यात येणार. त्याप्रमाणे भक्तास दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील दोन जिल्हे हे ऑनलाइन दर्शनासाठी सुरुवातीस निवडले आहेत.
या कार्तिकी यात्रेत कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यात येणार असून १ तासाला २०० ते २५० भाविकांना सोडण्यात येणार आहे. याला जर उत्तम प्रतिसाद मिळाला तर संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहे. कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्ताने मंदिर समितीचे वतीने येणाऱ्या भक्त, वारकरी, भाविक यांच्याकरिता चोवीस तास श्री विठ्ठलाच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. पंढरीत वारकरी येण्यास सुरुवात झाली आहे.

Story img Loader