अशोक सहकारी साखर कारखान्याच्या १५ मेगावॉट क्षमतेच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन येत्या रविवारी (दि. २०) दुपारी ३ वाजता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव पिचड उपस्थित राहणार आहेत.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमास साखर आयुक्त विजय सिंघल, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी मंत्री गोविंदराव आदिक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार अरुण जगताप, आमदार चंद्रशेखर घुले, आमदार शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभ व त्यानंतर अशोक महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन अशोक कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे, उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी केले आहे.

Story img Loader