शहरातील प्रभाग क्र. ४८ मध्ये आमदार नितीन भोसले यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेली व्यायामशाळा आणि जॉगिंग ट्रॅकचे उद्घाटन जुना श्री पंचदशनाम आखाडय़ाच्या महामंडलेश्वर साध्वी देवश्री गिरी यांच्या हस्ते झाले.
या वेळी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, कांचन पाटील, रत्नमाला राणे या नगरसेविका, मनसेचे शहर सरचिटणीस अभिजीत बगदे, संदीप बोरसे, नामदेव पाटील, सिडको विभाग महिला आघाडी अध्यक्ष ज्योती शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्तविक नामदेव पाटील यांनी केले. यावेळी आ. भोसले यांनी सिडको मतदार संघात आपली ९० कामे सुरू असून आम्हाला एका कामाकरता फक्त १५ लाख रूपये निधी देण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. आजच आम्ही प्रभागात दौरा केला असता किरकोळ समस्यांव्यतिरिक्त मोठय़ा समस्या आढळून आल्या नाहीत. याचाच अर्थ आमचे नगरसेवक समाधानकारक काम करत आहेत. नागरिकांनी या वास्तुंचे संवर्धन केले पाहिजे. मैदानावर कोणी दारू पित असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी आमदार निधीतून १३ लाख रूपयांचा निधी व्यायामशाळा व जॉगिंग ट्रॅकसाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली.

Story img Loader