तालुक्यातील बोरीस येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात आ. प्रा. शरद पाटील, आ. अनिल कदम, आ. दादा भुसे यांनी मार्गदर्शन केले. बोरीस व बोरसुले गावात शिवसेनेच्या दहा शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
स्थानिक काँग्रेस नेतृत्वाच्या दहशतीमुळे येथील कार्यकर्ते आपली भावना व्यक्त करण्यातही घाबरत होते. परंतु आता त्यांना कोणी धमकावू शकणार नाही, असा दिलासा आ. शरद पाटील यांनी दिला. या भागाला जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. दलित, आदिवासींच्या घरकुलांचे कामही झालेले नाही. रस्त्यांसह सिंचनाचे प्रश्न जैसे थे आहेत. आपण आमदार झाल्यानंतर अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून १०० दशलक्ष घनफूट पाणी कोठरे धरणासाठी राखीव करून घेण्यात आले असल्याचे आ. पाटील यांनी नमूद केले.
संभाव्य दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरोडॉरमध्ये या परिसराचा समावेश असल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला, १५ टक्के जमीन परतावा आणि प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन मिळाल्याशिवाय आपण भूसंपादन होऊ देणार  नाही असा इशाराही त्यांनी दिला.
आ. कदम, आ. भुसे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रा. अरविंद जाधव यांचीही भाषणे झाली. नेरचे सरपंच शंकर खलाणे, चौगावचे देविदास माळी, बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा