महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन ५३ वष्रे झाल्यानंतर सुद्धा तालुक्यातील हलबा-हलबी समाजाला न्याय न मिळाल्याने संतप्त समाजबांधवांनी महाराष्ट्र दिनी उमरखेड येथे घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे ५ मार्च २०१३ रोजी समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे सत्य माहिती मांडण्यात आली होती. समाजातला जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याकरिता केंद्र सरकारच्या १९५० पूर्वीच्या जनगणना व १९५० पूर्वीची महसुली नोंद, शालेय नोंद, जन्ममृत्यू नोंद हलबा हलबी हिचे आहे, ही नोंद विचारात न घेता राज्य सरकारने आदिवासी विकास विभागाच्या २४ एप्रिल १९८५ व २ डिसेंबर १९८७ च्या शासन निर्णयान्वये हे हलबी बदलवून राजकीय दबावाखाली घेतलेले आहेत, असा समाजाच्या वतीने आरोप करण्यात आला असून अनुसूचित जमाती कार्यालयाकडून हलबा-हलबी समाजाच्या जातपडताळणीच्या फाईली वर्षांनुवष्रे प्रलंबित असून त्यावर कोणत्याही प्रकारे योग्य ती कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
हलबा-हलबींतर्फे शासनाचा निषेध
महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन ५३ वष्रे झाल्यानंतर सुद्धा तालुक्यातील हलबा-हलबी समाजाला न्याय न मिळाल्याने संतप्त समाजबांधवांनी महाराष्ट्र दिनी उमरखेड येथे घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे ५ मार्च २०१३ रोजी समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे
First published on: 09-05-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposed by halba halambi to government