जिल्ह्य़ात गोसेखुर्द व बावणथडी हे प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यांचे थेंबभरही पाणी शेतकऱ्यांना सिंचनाला मिळाले नाही. उलट या प्रकल्पांचे पाणी नव्याने होऊ घातलेल्या वीज प्रकल्पांना देण्याचा घाट घातला जात आहे त्यामुळे जिल्ह्य़ात येणाऱ्या नव्या वीज प्रकल्पांना आपला विरोध राहील, असे अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर बोलतांना आमदार पटोले म्हणाले.
नागपूर कराराप्रमाणे दिवाळी अधिवेशन महिनाभरासाठी चालावे. ते काही दिवसातच गुंडाळले जाते. विदर्भाचे प्रश्न मागे पडतात. अ व ब दर्जाच्या धानाची तफावत दूर व्हावी. येथील शेतकऱ्यांच्या हक्काचे ३० कोटी रुपये त्यांना आष्टद्धr(२२४)वासनाप्रमाणे मिळावे. आष्टद्धr(२२४)वासन न पाळल्यामुळे आपण हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. भंडारा जिल्हा नक्षलवाद्यांचा ‘रेस्ट झोन’ आहे. कोणत्याही कारवाईनंतर नक्षलवादी भंडारा जिल्ह्य़ात येतात, याची माहिती शासनदप्तरी आहे. त्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्हा नक्षलवादग्रस्त घोषित करण्याकरिता सरकारवर दबाव आणण्यात येईल. वीजदरात झालेली ३३ टक्के दरवाढ मागे घेण्याकरिता पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्य़ातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा येथे व्हावे, याकरिताही चर्चा करू, तसेच जिल्ह्य़ातील पारंपरिक मासेमारांना गोसेखुर्द धरणात त्यांच्या व्यवसायापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असेही ते म्हणाले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा