अंबाजोगाई येथे न्यायालयाच्या इमारतीसाठी ३ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन प्रशासकीय इमारत तयार होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तात्पुरते न्यायालय सुरू करण्यात आल्याचे जिल्हा व सत्र न्या. विनय बोरीकर यांनी सांगितले.
अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक वारसा असून येथे १८४४ पासून न्यायदानाचे काम केले जाते. सर्वोच्च न्यायालयापर्यंतेच न्यायाधीश या भागातून तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. निजामकालीन न्यायालय इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारत बांधण्यासाठी पाठविलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीत तात्पुरते न्यायालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. एस. टी. महाजन, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर गिरवलकर, सचिव बाळासाहेब अंबाड, आदी उपस्थित होते.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optional building for court in ambajogai