जिल्हय़ातील बाभळवाडी येथे सरपंच, उपसरपंच निवडीच्या वेळी झालेल्या गोळीबार व लाठीमार प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर ठपका ठेवत विधानसभेत आमदार पंकजा पालवे व विधान परिषदेत अमरसिंह पंडित यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत या घटनेची चौकशी होणार असून, यात पिंपळनेर पोलीस दोषी आहेत का याचा उलगडा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. बीड तालुक्यातील बाभळवाडी गट ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीच्या दिवशी जमावाने दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार व नंतर हवेत गोळीबार केला. यात ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेनंतर निष्पाप लोकांना मारहाण करून शंभरजणांना अटक केली. त्यामुळे गावात पोलिसांची दहशत निर्माण झाली. रात्रीच गावाच्या बाहेर एका गटाने रस्त्यावर खड्डे खोदले होते, हे माहीत असताना पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? अतिरिक्त बंदोबस्त का मागवला नाही? असे आरोप पोलिसांवर करण्यात आले. त्यावर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा