पंचगंगा-कृष्णा नदी प्रदूषणासंदर्भात बैठकीसह वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती शिरोळच्या छत्रपती ताराराणी आघाडीचे संस्थापक प्रसाद धर्माधिकारी यांनी दिली आहे.    
शिरोळ तालुक्यात सध्या पंचगंगा-कृष्णा नदीपात्रात दूषित पाण्याबरोबरच जलपर्णीचा विळखा वाढला आहे. बारा महिने दूषित पाण्यामुळे वैतागलेल्या शिरोळ तालुक्यातील जनतेला ऐन उन्हाळ्यातच हे संकट उभे राहिले आहे. प्रशासनाने जबाबदारी झिडकारून शिरोळ तालुक्यातील दूषित व विषारी पाण्याने हैराण झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळून हद्दवाढीचा वाद निर्माण केला आहे. त्यावर ताराराणी आघाडीचे संस्थापक धर्माधिकारी यांनी जिल्हाधिकारी माने यांच्याकडे याबाबतचे निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकारी माने यांनी पत्राद्वारे उपविभागीय अधिकारी इचलकरंजी, अधीक्षक अभियंता पाटबंधारे कोल्हापूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांना बैठक आयोजित करून त्याचा अहवाल सादर करण्याचेआदेश दिले आहेत.

Story img Loader