रस्त्यांच्या मध्यभागी अडथळा
रहदारीला अडथळा ठरलेले शहरातील रस्त्यांच्या मधोमध उभे करण्यात आलेले वीजेचे खांब श्रीगोंदे रस्त्यावरील अतिक्रमणांसह कुळधरणच्या बसस्थानकावरील अतिक्रमणे तत्काळ हटवण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी कर्जतचे प्रभारी तहसीलदार जैयसिंग भैसडे यांना दिले.
पाचपुते यांनी आज जामखेड तालुक्यातील सोनेगावला भेट देण्यासाठी जाताना श्रीगोंदे-कर्जत रस्त्यावरील दूरगाव तलावाला भेट दिली. यावेळी तलावातील पाणी साठा व तिथे भरले जाणारे टँकरची पहाणी केली. त्यांच्यासमवेत राजेद्र गुंड होते. दूरगाव तलावातील पाण्यावरच तालुका अवलंबून आहे, त्यामुळे तात्काळ कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्याला मिळावे अशी मागणी गुंड यांनी यावेळी केली.
पाचपुते यांनी नंतर कर्जत येथील पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांंशी चर्चा केली. तालुकाध्यक्ष नानासाहेब निकत, काकासाहेब तापकीर, अशोक जायभाय, सजय सुद्रीक, बबन नेवसे आदी यावेळी उपस्थित होते. तहसीलदार भैसडे यांना कुळधरन व कर्जत मधील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी संदीप कोकडे यांच्याविषयी तक्रारी मांडल्या असता, अधिकाऱ्यांनी काम करावे अन्यथा त्यांना अन्यत्र पाठवावे लागेल असा इशारा दिला. दि. १ मार्चपासून मागेल त्याला छावणी देण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी, रोजगार हमीच्या कामासाठी पैसे कमी पडू देणार नाही असे पाचपुते यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to clear the electric poll of karjat city