मूळ दस्तऐवजात खाडातोड, खोटी नोंद करणे, तसेच फिर्यादीच्या आजोबाच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तेचा संगनमताने दुरुपयोग करून फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरीच्या माजी नगराध्यक्षा शालिनी देशमुख, त्यांचे पती रत्नाकर देशमुख व रमेश पुंजाजी बुस्रे या तिघांविरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश कळमनुरी न्यायालयाने दिले.
प्रशांत बाबुराव देशमुख यांनी फिर्याद दिली. माजी नगराध्यक्षा शालिनी रत्नाकर देशमुख, त्यांचे पती रत्नाकर बाबुसाहेब देशमुख, तसेच रमेश पुंजाजी बुस्रे (सर्व कळमनुरी) यांनी फिर्यादीविरुद्ध संगनमताने कटकारस्थान रचून आर्थिक देवाण-घेवाण करून फिर्यादीचे आजोबा मृत दिगंबरराव देशमुख यांच्या मालमत्तेच्या नोंदीमध्ये खोटे दस्तऐवज, नोंदी तयार करून दुरुपयोग केला.
फिर्यादीच्या आजोबाच्या दत्त मंदिराचे क्षेत्रफळ १९२ चौरसफूट व दत्त मंदिर सभागृह ८०० चौरसफूट आहे. तसेच मालकीहक्काची नोंद घर क्रमांक ५-३-३२, ज्याचे क्षेत्रफळ २ हजार ७७६ चौरसफूट व ५-३-३३ व ५-३-३४ याची नोंद दत्तमंदिराच्या नावे असून, ती फिर्यादीच्या आजोबाच्या नावे आहे. ही सर्व मालमत्ता वडिलोपार्जित असून या संदर्भात अजून कुठल्या वाटण्या झाल्या नसताना आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार केले. त्यात बेकायदा नोंद करून आरोपी रत्नाकर व शालिनी देशमुख यांची नावे नगर परिषदेच्या नोंदीत, शासकीय अभिलेख्यात व मालकीच्या रकान्यात नोंदविली. फिर्यादी व फिर्यादीच्या इतर वारसाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा