वादग्रस्त जिल्हा पुरवठा अधिकारी भिकाजी घुगे यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीची चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश राज्याचे प्रधान सचिव भगवान सहाय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. भिकुलाल बाहेती व इतरांनी ही तक्रार केली होती. घुगेंच्या कार्यपद्धतीविरुद्ध रास्त भाव दुकानदारांमध्ये गेल्या वर्षभरापासून असंतोष आहे. त्यांच्याविरुद्ध विविध संघटनांनी लेखी तक्रारी दिल्या, आयुक्त कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले. जिल्हा रास्तभाव दुकान व किरकोळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष भिकुलाल बाहेती, आसिफ म. सिराज गौरी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी २८ फेब्रुवारीला प्रधान सचिव भगवान सहाय यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत सहाय यांनी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु तक्रारींमध्ये काही तथ्य आढळले नाही तर तक्रारदारांविरुद्ध कडक कारवाई करावी, असेही पत्रात स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा