महाबळेश्वरातील शिंदोळा पठारावरील वादग्रस्त बांधकामाबाबत तातडीने कुठलेही विकासकामे, उत्खनन, वृक्षतोड थांबवत, जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिला आहे.
महाबळेश्वरमधील सव्र्हे नं. २७, २८, २९ मध्ये सपाटीकरण करून तेथे आठ एकर जागेभोवती मोठमोठे लोखंडी अँगल लावून त्यावर उंच उंच पत्रे लावण्याचा धनिक व दलालांचा प्रकार नुकताच दै. ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केला होता. यावर महाबळेश्वर तहसील कार्यालयाने तातडीने हालचाली करून वरील मिळकतीचा पंचनामा व त्याचा अहवाल गावकामगार तलाठी शिंदोळा यांना त्वरित सादर करायला सांगितले होते. तलाठी यांनी पंचनाम्यासह अहवाल सादर केल्यानंतर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी महाबळेश्वर नीलप्रसाद चव्हाण यांनी संबंधित मिळकतधारक मालक हरीश बाणी, मनोज म्हात्रे, हरिचंद्र म्हात्रे, किसन प्रभुदास बाणी, मनीषा संतोष शेडगे, प्रीतम म्हात्रे, रवि मेहबुबाणी, मनीषा पाटील, जयश्री कोल्हेकर यांना नोटीस पाठवून मौजे शिंदोळा, ता. महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील सव्र्हे नं. २७/अ/२, २७/अ/३, २७/अ/४ २७/अ/५ मध्ये पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे बांधकाम, उत्खनन, वृक्षतोड करू नये व पत्रा कंपाऊंडही दूर करून असणारी जैसे थे परिस्थिती ठेवावी असा आदेश दिला आहे. यामुळे महाबळेश्वर शहरासह परिसरातील दलालांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा