जमिनीची उत्पादकता, मानवी स्वास्थ्य, स्थानिक व जागतिक बाजारपेठेतील सेंद्रीय मालाची वाढती मागणी, याचा विचार करून हरितक्रांतीचे कमी खर्चाच्या, बिनकर्जाच्या व किफायतशीर अशा शाश्वत शेतीत रूपांतर करणे ही आजची गरज आहे.
सेंद्रीय म्हणजे सजीवपणाचे मूळ व सेंद्रीय शेती म्हणजे प्रदिर्घ चालणारी उत्पादन पध्दती स्वीकारून जमिनीची सुपिकता वाढवून सजीव पध्दतीतील चतन्य आणणे होय. एकंदरीत सेंद्रीय शेती पध्दती म्हणजे निसर्गाशी जवळीक होय, असे उदगार हिराटोलाच्या मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे संस्थापक कैलाश डोंगरे यांनी केले.
केंद्र सरकारव्दारा सेंद्रीय शेती अभियानांतर्गत रिजनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फॉर्मिग, नागपूरच्या वतीने मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. डोंगरे म्हणाले की, विकसित कृषी तंत्रज्ञानावर आधारित रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करून मागील काही दशकात आपण कृषी उत्पादनात गरूड झेप घेऊन हरितक्रांती केली.
सेंद्रीय शेती ही केवळ एक शेतीपध्दती नसून ते एक विकसित तंत्र आहे. त्यात रसायन वापरावर बंदी असते. स्थानिक परिस्थितीचा विचार व स्थानिक संसाधनाचा पुरेसा वापर करून जमिनीची दीर्घकालीन सुपिकता टिकविणे, कृषी तंत्रज्ञानाच्या वापराने निर्माण झालेली प्रदूषणे टाळणे, सकस आहाराचे पुरेसे उत्पादन घेणे, जमिनीतील जीवजंतू व वनस्पती अवशेषांचा पुरेपूर वापर करणे, जनावरांचे नसíगकरित्या संगोपन करणे आदींचा अंतर्भाव होतो. या साऱ्याचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी रिजनल सेंटर ऑफ आरॅगॅनिक फॉर्मिग नागपूरचे डॉ. व्ही.वाय. देवघरे होते. त्यांनी सेंद्रीय शेतीत बायोफर्टलिाझर्सचा उपयोग कसा करायचा, यासंदर्भात विद्यार्थ्यांना एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या माध्यमाने सविस्तर प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणासाठी नागपूरच्या निम इंफॉम्रेशन एन्ड टेक्नोलॉजी डेव्हलोपमेंट सेंटरचे प्रशिक्षक संचालक लक्ष्मीकांत पडोळे, तसेच येथील रुची बायोफर्टलिाझर्सच्या प्रतिनिधींनी जैविक कीटकनाशके व रासायनिक कीटकनाशके यातील तफावत सांगून पर्यावरणावर, मानवी जीवनावर व धरतीमातेवर होणारे विपरित परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. कृषी मार्गदर्शक डॉ.के.एस. गजभिये व प्राचार्य डी.आर. आगाशे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशासकीय अधिकारी सूर्यकांत डोंगरे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा