महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात सम्यक विचार मंचच्या वतीने येत्या ११ ते १४ एप्रिलपर्यंत १४ व्या मिलिंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून यात पंजाबराव वानखेडे (मुंबई), प्रा. डॉ. ॠषिकेश कांबळे (औरंगाबाद), प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा (पुणे) व प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे (कराड) हे वक्ते विचारपुष्प गुंफणार आहेत.
हुतात्मा स्मृतिमंदिरात दररोज सायंकाळी ६.३० वाजता आयोजिलेल्या या मिलिंद व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या हस्ते होणार असून पहिले विचारपुष्प पंजाबराव वानखेडे हे (विषय-धम्म आचरणाशिवाय बौध्द कसे?) गुंफणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने हे उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती सम्यक विचार मंचचे सचिव सुधीर चंदनशिवे यांनी सांगितली.
दि. १२ रोजी प्रा. डॉ. ॠषिकेश कांबळे (राष्ट्रचिंतक डॉ. बाबासाहेब आंबेडकर) व दि. १३ रोजी प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा (सम्राट अशोकाचे जीवन व कार्य) आणि दि. १४ रोजी अंतिम दिवशी प्रा. मच्छिंद्र सकटे (समतावादी चळवळीपुढील आव्हाने) याप्रमाणे व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर हे उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा