सरत्या मे महिन्यात उष्णेतेने कमाल पातळी गाठल्याने दिवसा सर्वसामान्यांचा जीव आधीच मेटाकुटीस आलेला असताना रात्रीही लग्नानिमित्त झडणाऱ्या हळदी समारंभांनी अनेकांच्या झोपेचे खोबरे होऊ लागले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात लग्नापेक्षा हळदी समारंभांना विशेष महत्त्व असते. लग्नाच्या आदल्या रात्री त्यानिमित्त सामिष भोजन तसेच मद्याच्या पाटर्य़ा झडतात. हल्ली मात्र हळदी समारंभ रितीरिवाजांपेक्षा प्रतिष्ठा आणि मोठेपणा दाखवून देण्यासाठी साजरे होऊ लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा