माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजभळ यांच्या कार्यकाळातील कामात कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात त्या काळात असलेले अधिकारी आणि काही कंत्राटदार धास्तावले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्दावरून सध्या राज्यात छापे सत्र सुरू आहे. नागपूरमध्येही एका निवृत्त अधिकाऱ्याऱ्या घराची झडती घेण्यात आली. तेव्हापासून भुजबळ मंत्री असतानाच्या काळात ‘गब्बर’ झालेले अधिकारी आणि कंत्राटदार कमालीचे धास्तावले आहेत. आपल्यावरही कारवाई होऊ शकते या भीतीने त्यांना ग्रासले असून त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. नागपूरमध्ये गाजलेल्या ११९ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यापैकी निलंबनाचा काळ संपल्यावर काहींना महत्त्वाच्या जागेवर पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा