महेश भट्ट यांच्या ‘विशेष फिल्म्स’ला विशेष यश मिळाले ते त्यांचा भाचा इम्रान हाश्मीमुळे. इम्रानला चित्रपटसृष्टीत संधी दिली महेश भट्ट यांनीच. इम्रानची लोकप्रियता एवढी वाढली की, त्याने चित्रपटांसाठी विशेष फिल्म्सच्या बाहेर उडी घ्यायला सुरुवात केली आणि इथेच त्याच्याशी महेश भट्ट यांचे वाजले.  भट्ट यांना इतके खटकले की त्यांनी इम्रानला बाहेरचा रस्ता दाखवत कुणाल खेमू आणि मग रणदीप हुडा या दोघांना भट्ट कॅम्पचे नायक म्हणून घोषित के ले. पण, इम्रानला जे यश मिळाले ते या दोघांनाही न मिळाल्याने पुन्हा एकदा भट्ट मंडळी इम्रानच्या मागे लागली आहेत.  
आता पुन्हा एकदा इम्रानशी दिलजमाई करण्याचे महेश आणि मुकेश भट्ट यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरीकडे ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘एक थी डायन’ या बालाजी प्रॉडक्शनच्या तीन चित्रपटांना यश मिळवून दिल्याने एकता कपूरसाठीही इम्रान हुकमी एक्का झाला आहे. त्याच्यासाठी ती पुढचे चित्रपट घेऊन तयार आहेच. शिवाय, यूटीव्हीबरोबरही इम्रान चित्रपट करतो आहे. त्यामुळे यातून तो भट्ट कॅम्पच्या चित्रपटांना वेळ देणे अवघडच आहे. या वेळी मात्र इम्रानवर टीका करण्याऐवजी.. नाही तो करतोय, तो आम्हाला सोडून जाणार नाही.. अशी नरमाईची भूमिका भट्ट कॅम्पकडून सातत्याने घेतली जाते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा