शहरातील श्री समर्थ सहकारी बँकेस मार्च २०१३ अखेरीस दोन कोटी ५८ लाख ७१ हजार रुपये इतका ढोबळ नफा झालेला आहे. मागील वर्षांपेक्षा हा नफा ५४ लाख ६१ हजार रुपयांनी अधिक आहे. बँकेच्या थकीत कर्जाचे प्रमाण ४.९३ टक्के असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष वासुदेव रवळगावकर यांनी दिली.
बँकेच्या शहरात सात शाखा कार्यरत असून मागील आर्थिक वर्षांचे ठेवींमध्ये ३१ कोटींने वाढ झाली असून मार्च २०१३ अखेरीस एकूण ठेवी १५५ कोटी ५० लाख रुपये आहेत. कर्ज वाटपात २१ कोटीने वाढ होऊन एकूण कर्ज वाटप ९४ कोटी ७० लाख रुपये आहे. बँकेच्या एकूण गुंतवणुकीत १२ कोटी २१ ने वाढ झाली असून एकूण गुंतवणूक ७२ कोटी ४२ लाखपर्यंत गेली आहे. बँकेचे एकूण १२,०२४ सभासद असून वसूल भागभांडवल चार कोटी ७८ लाख इतके आहे. बँकेच्या एकूण व्यवसायात २०१२-१३ या आर्थिक वर्षांत ५२ कोटीने वाढ झालेली आहे. मागील वर्षांप्रमाणे निव्वळ एनपीए (शून्य टक्के) आहे. बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून लवकरच बँकेच्या डेटा सेंटरची उभारणी करून कोअर बँकिंग प्रणाली पूर्ण करणार आहे. बँकेच्या मुख्य शाखेत फ्रँकिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच शिवाजीनगर शाखेत वीज बील भरणा सुविधा, राजीवनगर शाखेत एटीएम तसेच टेलिफोन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुख्य शाखा, गंगापूररोड, शिवाजीनगर, पंचवटी, राजीवनगर या शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध आहे. संचालक, कर्मचारी तसेच सभासद व खातेदारांच्या सहकार्याने ही प्रगती झाल्याची माहिती रवळगांवकर यांनी दिली आहे.
समर्थ बँकेस दोन कोटींपेक्षा अधिक नफा
शहरातील श्री समर्थ सहकारी बँकेस मार्च २०१३ अखेरीस दोन कोटी ५८ लाख ७१ हजार रुपये इतका ढोबळ नफा झालेला आहे. मागील वर्षांपेक्षा हा नफा ५४ लाख ६१ हजार रुपयांनी अधिक आहे. बँकेच्या थकीत कर्जाचे प्रमाण ४.९३ टक्के असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष वासुदेव रवळगावकर यांनी दिली.
आणखी वाचा
First published on: 05-04-2013 at 12:47 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over two carod profit to samarth bank