वर्धेकरांना यावर्षी गुढीपाडव्यानिमित्य पाडवा पहाट व सांज पाडवा अशा दोन संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी लाभणार आहे. रामनवमी शोभायात्रा नागरी समितीतर्फे  पाडव्यास पहाटे पाच वाजता संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश मंदिर परिसरात होणाऱ्या यावर्षीच्या कार्यक्रमास सुप्रसिध्द गायक श्रीधर फ डके व चमूची हजेरी लागणार आहे. आमदार प्रा.सुरेश देशमुख व यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेने कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. कार्यक्रमानिमित्य फु लांची उधळण, प्रभातफे री, शहर सजावट, मिठाई वाटप होणार आहे. पाडव्यालाच सायंकाळी सहा वाजता स्वरांजली संस्थेतर्फे  सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सारेगमफे म हिंडोल पेंडसे, ई टिव्हीफेम श्रुती
जैन व श्याम शिंदे हे सूरांची मैफील सजवतील. विकास विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा