तालुक्यातील पळसे ग्रामविकास मंडळ संचलित सार्वजनिक वाचनालय आणि नाशिक ग्रामीण साहित्य चळवळ यांच्या वतीने उत्कृष्ट साहित्यासाठी देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अध्यक्ष विष्णूपंत गायखे यांनी दिली.
पळसे ग्रामविकास मंडळाचे माजी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते भास्करराव ढेरिंगे स्मृती साहित्यकृती पुरस्कार कवी विवेक उगलमुगले यांना ‘सांगावेसे वाटते म्हणून’ काव्यसंग्रहासाठी, संपतराव ढेरिंगे स्मृतीनिमित्त नालासोपाऱ्याचे जॉन रॉड्रिग्ज यांना ‘घटस्फोट पालकांचा बळी बालकांचा’ कादंबरीसाठी, अब्दुल अहमद मुलाणी स्मृतीनिमित्त डॉ. अप्पासाहेब पवार यांना ‘अविश्रांत मी’ या आत्मकथनासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. अ‍ॅड. सर्वोत्तमराव पांडे उत्कृष्ट आत्मकथन पुरस्कार मुंबईच्या सुमन फडके यांना ‘इवल्याशा तळ्याच्या काठाशी’ करीता तर, ज्येष्ठ कीर्तनकार नाना ताजनपुरे बालकाव्यसंग्रह पुरस्कार वरळीचे सुकुमार नितोरे यांना ‘किलबिलाट’साठी, प्राचार्य एन. टी. गायधनी चरित्र पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांना ‘महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत-दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ या पुस्तकासाठी, चंद्रभागा व विश्रामजी आठवले काव्यसंग्रह पुरस्कार नांदगावचे दयाराम गिलाणकर यांना ‘बळीचं जिणं’करीता, अर्जुनराव शिंदे ग्रामीण काव्यसंग्रह पुरस्कार पिंपळगाव बसवंतचे सोमनाथ पवार यांना ‘पोशिंदा’ साठी जाहीर झाले आहेत. सुमन व मुकुंदराव मालुंजकर ललित लेखसंग्रह पुरस्कार नाशिकच्या ज्योत्स्ना पाटील यांना ‘खान्देशी मायाबहिणी’साटी, साने गुरूजी एकांकिका पुरस्कार रामनाथ माळोदे यांना ‘ये, नाव काय तुझं? आणि इतर एकांकिका’ यासाठी, यशवंत पोरजे कथासंग्रह पुरस्कार पुण्याच्या जयश्री बापट यांना ‘जीवनसंगीत’ यासाठी जाहीर करण्यात आले. १३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कुलच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा